Ticker

6/recent/ticker-posts

विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरती तात्काळ पूर्ण करा || Mahavitaran Bharti 2020 Latest Update

विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरती तात्काळ पूर्ण करा || Mahavitaran Bharti 2020 Latest Update

   महावितरण भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करा भरती प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची मागणी...

     वीज वितरण कंपनीने मागच्या वर्षी 2,000 उपकेंद्र सहाय्यक व 5,000 विद्युत सहाय्यक पद भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली होती . ही निवड प्रक्रिया पार पडली परंतु अनेक कारणाने या भरती प्रक्रियेवर ते देण्यात आले. या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मध्ये आता नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही स्थगित झालेली भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील या भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन दिले. 

     महाराष्ट्रातील दीड लाख उमेदवारांनी 2,000 उपकेंद्र सहाय्यक व 5,000 विद्युत सहाय्यक या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला व त्यापैकी दोन हजार उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेऊन जवळपास एक वर्षाने निकाल जाहीर केला. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कागदपत्र पडताळणी ची तारख (दिनांक) जाहीर केली. परंतु जाहीर केलेल्या तारखेला कागदपत्र पडताळणी झालीच नाही.

    महावितरण'ने दिलेल्या सूचनेप्रमाणे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट जमा करून मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा काढले होते परंतु मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे महावितरणच्या भरतीवरील स्थगिती देण्यात आली . 13% टक्के उमेदवारांमुळे 87% टक्के उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे महावितरण कंपनीने तात्काळ विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती पूर्ण करावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील भरती प्रक्रियेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन दिले आणि भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी केली.


Post a Comment

0 Comments